30.10.2026 : राज्यपालांच्या उपस्थितीत जम्मू-काश्मीर आणि लडाख स्थापना दिन संपन्न
30.10.2026 : केंद्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे जम्मू-काश्मीर आणि लडाख स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जीएचआरटी इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. एच. आर. रहमान, आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे, कुलसचिव गणेश भोरकडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जम्मू काश्मीर येथून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले ‘युवा संगम-७’ चे सदस्य, जम्मू-काश्मीर डोगरा समाज आणि काश्मिरी पंडित असोसिएशनचे सदस्य, चित्रपट कलावंत, विद्यार्थी आणि जम्मू-काश्मीरचे मुंबईस्थित मान्यवर उपस्थित होते.