31.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘भटके विमुक्त दिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळा संपन्न
31.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘भटके विमुक्त दिवस’ राज्यस्तरीय सोहळा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण विभाग व भटके विमुक्त विकास विभागाचे मंत्री अतुल सावे, राज्य विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळज, विभागाच्या संचालिका सोनाली मुळे व निमंत्रित उपस्थित होते.