बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:

    04.08.2026: उत्तर पूर्व राज्यातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली

    उत्तर पूर्व राज्यातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची…

    तपशील पहा
    03.08.2026:   गिरगाव मुंबई येथील आर्यन हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपण लिहिलेल्या तीन पुस्तकांचा संच भेट दिला.  लेखकांचे अभिनंदन  करताना राज्यपाल म्हणाले की, जेव्हा लेखक पुस्तक लिहितो, तेव्हा तो आपल्या विचारांना पंख देतो व जगाच्या ज्ञानात भर घालतो. पुस्तक कधीही मरत नाही. लेखक समाजाला काहीतरी परत देत असतो.  एकमेकांना भेटताना पुष्पगुच्छ न देता पुस्तके दिली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.   महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी आहे. राज्यात लेखकांची देखील एक मोठी परंपरा आहे. आज आपण ई-पुस्तकांच्या युगात वावरत असलो तरी देखील पारंपरिक पुस्तक वाचनाचे महत्व वेगळे आहे व पुस्तक वाचनाचा आनंद कायम आहे. नव्या युगात पारंपरिक पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.नामजोशी यांनी राज्यपालांना 'मोगरा फुलाला दारी' हा कथासंग्रह, 'स्मृतिगंध' हे समाजातील गणमान्य व्यक्तींशी केलेल्या पत्रव्यवहाराचे संकलन असलेले पुस्तक तसेच 'भीमा' ही आदिवासी मुलीच्या कर्तृत्वाची व तिच्या आईच्या त्यागाची कहाणी असलेली कादंबरी भेट दिली. यावेळी नामजोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    03.08.2026: आर्यनचे माजी मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांचेकडून राज्यपालांना पुस्तक भेट

    आर्यनचे माजी मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांचेकडून राज्यपालांना पुस्तक भेट पारंपरिक पद्धतीने पुस्तक वाचनाचा आनंद हरवू…

    तपशील पहा
    Maharashtra Governor pays tributes to Kranti Sinh Nana Patil

    03.08.2026 राज्यपालांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    राज्यपालांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा
    01.08.2026: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आज राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाशेजारी खुल्या परिसरात झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात केंद्रीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील वृक्षारोपण केले. वातावरण बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नागपूर जिल्ह्यात २५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प घेण्यात आलेला आहे. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर नीता ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, आदी उपस्थित होते.

    01.08.2026: विद्यापीठात माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण

    01.08.2026 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर जनसंपर्क विभाग ……………………………………………………….. विद्यापीठात माननीय राज्यपाल श्री. जिष्णू…

    तपशील पहा
    01.08.2026 : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

    01.08.2026: राज्यपालांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

    राज्यपालांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु…

    तपशील पहा
    31.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १७ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ मुंबई येथे करण्यात आला. मुंबई मॅरेथॉन जगातील सर्वात अधिक स्पर्धक असणारी  समावेशक मॅरेथॉन झाल्याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले तसेच मॅरेथॉनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या सैन्य दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. डी एस कुशवाह, मॅरेथॉन आयोजक संस्था प्रोकॅमचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंह, सहसंचालक विवेक सिंह तसेच मॅरेथॉन प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    31.07.2026: राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ

    राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ दिनांक १७ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई…

    तपशील पहा
    30.07.2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर  विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ आज  राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या दीक्षांत प्रांगणात संपन्न झाला. माजी खासदार (राज्यसभा) डॉ. विनय सहस्रबुध्दे यांनी दीक्षांत भाषण केले. दीक्षांत समारोहात पद्मभूषण  प्रा. डॉ. जेष्ठराज जोशी यांना डी. एस्सी. तर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना डी. लिट. ही मानद पदवी देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाच्या उद्यम स्टार्टअप दालनाला भेट देऊन नव संशोधन व उद्यमिता उपक्रमांची माहिती घेतली.   यावेळी एकूण ११ हजार ८५१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले, तसेच १६२ संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर ५७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले .  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे,  प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, विविध विष्यशाखांचे व‍िभाग प्रमुख तसेच स्नातक व‍िद्यार्थी उपस्थ‍ित होते.

    30.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विचार…

    तपशील पहा

    29.07.2026: आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते यांची नियुक्ती

    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते यांची नियुक्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे अधिष्ठाता…

    तपशील पहा
    28.07.2026: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा राज्यापाल जिष्णू देव वर्मा यांनी प्राधिकरणाच्या मुख्यालयात आढावा घेतला.  यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    28.07.2026: सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचवणार-राज्यपाल जिष्णू देव वर्मा

    सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचवणार-राज्यपाल जिष्णू देव वर्मा राज्यपालांनी केले कुंभमेळा नियोजनाचे कौतुक प्राधिकरणाच्या…

    तपशील पहा
    29.07.2026:  राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या पुढाकाराने आयोजित 'टीबीमुक्त मुंबई' अभियानांतर्गत आज चेंबूर मुंबई येथील श्री नारायण गुरु महाविद्यालय येथून राष्ट्रीय सेवा योजनेतील शेकडो स्वयंसेवकांची 'जनजागृती फेरी' काढण्यात आली.  जनजागृती फेरीमध्ये राज्यपालांसह ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी व प्रसिद्ध युवा अभिनेते व प्रभावक शिव ठाकरे सहभागी झाले व त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी राज्यपालांनी सर्व उपस्थितांना टीबी मुक्त मुंबई' करण्याची शपथ दिली. युवकांच्या 'जनजागृती फेरी'ने चेंबूर परिसरातील दाट वस्तीच्या भागांमध्ये टीबी मुक्त मुंबईचा संदेश दिला. 'जनजागृती फेरीचे आयोजन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना सेलने, श्री नारायण गुरु कॉमर्स कॉलेज चेंबूर, बृहन्मुंबई महानगरपालिका व भामला फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले.  कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, श्री नारायण मंदिर समितीचे महासचिव ओ के प्रसाद, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव एस रामामुर्ती, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला, महाविद्यालयाच्या प्राचार्य जयश्री वेंकटचलम  व एनएसएस सेलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ सुशील शिंदे उपस्थित होते.

    29.07.2026: राज्यपाल, अभिनेते राकेश बेदी, इन्फ्लूएंसार शिव ठाकरे यांच्या उपस्थितीत चेंबूर येथे टीबी मुक्त रॅलीचे आयोजन

    राज्यपाल, अभिनेते राकेश बेदी, इन्फ्लूएंसार शिव ठाकरे यांच्या उपस्थितीत चेंबूर येथे टीबी मुक्त रॅलीचे आयोजन…

    तपशील पहा
    Governor presides over the Convocation of the MUHS

    28.07.2026:- दीक्षांत समारंभ ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा-राज्यपाल

    दीक्षांत समारंभ ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा-राज्यपाल जिष्णू देव वर्मा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा…

    तपशील पहा
    27.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोकभवन, मुंबई येथे कारगिल विजय दिवस स्मरणोत्सव व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .  यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्ते वीर माता, वीर पिता, वीर नारी, कारगिल युद्धात अपंगत्व आलेले वीर जवान तसेच शौर्य पदक विजेत्या जवानांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कवी प्रदीप यांच्या रचनेवर आधारित भरत बळवल्ली यांच्या गीताचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन, स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे जनरल ऑफिसर कमांडींग ले. जन.डी. एस कुशवाह, तसेच सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने वीर सेनानी फाउंडेशन तसेच स्वरनिनाद फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले होते. यावेळी नौदलाच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तीपर गीताच्या धून सादर केल्या तसेच नचिकेत देसाई व शिवम या गायकांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

    27.07.2026: लोकभवन येथे कारगिल विजय दिवस स्मरणोत्सव; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी केला वीर योद्ध्यांचा गौरव

    कारगिल विजय दिवस हा आपल्यासाठी राष्ट्रनिष्ठा, शौर्य आणि बलिदानाचा प्रेरणादायी संदेश – राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा